पुस्तकांचा परिचय

संस्कृत स्तोत्रांचा आणि श्लोकांचा सहज सोप्या भाषेत अनुवाद
मराठी जनांना सुपरिचित अथर्वशीर्ष, रामरक्षा याखेरीज ऋग्वेदातील श्रीसूक्त, पुरुषसूक्त तसेच आ नो भद्रा (स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः) सूक्त यांच्या बरोबरीने दशाननाचे शिवताण्डव स्तोत्र, व्यंकटेश सुप्रभातम् तसेच पं. रामकृष्ण कवींचे अयि गिरिनंदिनि, शिवमहिम्न आणि इतरही अनेक स्तोत्रे. याबरोबरच आद्य शंकराचार्यांची अनेक स्तोत्रे यात समाविष्ट केलेली आहेत.

स्तोत्र मंजूषा च्या माध्यमातून...

सर्व मराठी जनांसाठी सुपरिचित अश्या अथर्वशीर्षाचा मराठी गद्य आणि पद्य अनुवाद तुम्हाला या ठिकाणी वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि तुमच्यासह तमाम मराठी जनांना संग्रहित करता यावा या दृष्टीने हा आमचा एक छोटासा प्रयास

अथर्वशीर्ष आणि त्याच्या अनुवाद - स्त्री वाणीतून
स्त्री आणि पुरुष यांच्या संयुक्त वाणीतून
कवि कुलगुरु कालिदासाचं एक दुर्लक्षित लघुकाव्य आणि स्वैर भावानुवाद
केवळ ऋतुवर्णनाला वाहिलेलं संस्कृत भाषेतलं एकमेव काव्य. 'अस्ति कश्चित वागर्थः' कालिदासाबद्दलची एक सर्वश्रुत आख्यायिका. त्याच्यावर अन्याय करणारी! तिला छेद देणारी व कालिदासाच्या उमेदवारीच्या काळातल्या या काव्यावर प्रकाश टाकणारी, त्याच्या गुणदोषांची आणि काव्याच्या स्वरूपाची चर्चा करणारी प्रस्तावना. उपयुक्त परिशिष्टं. आणि समश्लोकी रसाळ भावानुवाद. प्रत्येक लोक अनुरूप चित्रासहित. महाराष्ट्र टाईम्सनं 'एक सुखावून टाकणारा भावानुवाद' म्हणून प्रशंसलेला !
'गीतगोविंद' हे कवी जयदेव यांचे मधुराभक्तीने परिप्लुत, अजरामर गीतिकाव्य
'गीतगोविंद' हे महाकाव्य किंवा खंडकाव्य नसून, स्वतः जयदेवाने प्रथम सर्गाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे ती 'रतिकेलिकथा' शृंगार-भक्तिपर काव्य आहे. एक गीतनृत्यनाट्य आहे. या काव्यातील मुख्य पात्रे राधा व कृष्ण. याखेरीज राधेची एक सखी, जी मुख्यतः मध्यस्थ दूती म्हणून काम करते. एकमेकांचे निरोप पोहोचवते व राधेची समजूतही काढते. या काव्याचा विषय आहे- राधा-कृष्णांचा परस्पर अनुराग, वियोग, उत्कंठा आणि मीलन.
गमती देशोदेशीच्या - भाग १ - अनामिका बोरकर
या पुस्तकात आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव वाचता येतील. कधी नवीन माहिती कळेल तर कधी पुनः प्रत्ययाचा आनंद मिळेल. काही स्थळे तर खूपच वेगळी, त्याच्यासारखे दुसरे काही न बघितल्यासारखी वाटतील. या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या, स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा..
गमती देशोदेशीच्या - भाग २ - अनामिका बोरकर
या भागात आपण ट्रॉयच्या सुप्रसिद्ध ट्रोजन हॉर्सची भेट घेणार आहोत. सिंगापूरच्या नवीन वर्षाची गडबड अनुभवणार आहोत. अर्जेंटिना ते चिली असा तळ्यातून प्रवास करून बॅलेस्टसच्या बुबु पक्षांना, सी लायनना भेटणार आहोत, इन्कांच्या संस्कृतीची ओळाख करून घेणार आहोत. नॉर्वेला जाऊन मध्यरात्रीचा सूर्य, स्वित्झर्लंडला जाऊन पृथ्वी वरचा स्वर्ग बघणार आहोत, दुबईला जाऊन शॉपिंग फेस्टीवल मध्ये खरेदी करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिथे जाणे जवळपास अशक्य वाटते अशा दलाईलामांच्या पोताला पॅलेस मध्येही जाऊन येणार आहोत. टर्कीमधला कापसाचा राजवाडा, नावेसर मधील जमिनीखालचे गाव अशा बऱ्याच गमतीजमती या पुस्तकात आपल्याला अनुभवायच्या आहेत.