लेखक धनंजय बोरकर यांचा परिचय...

लेखक म्हणून उदय...

सिंगापूर येथे धनंजय बोरकर यांनी महाराष्ट्र मंडळाच्या स्थापने पासून ते सरकार दरबारी मंडळाची नोंद घेतली जाईल इथपर्यंत आवश्यक ती धडपड केली आणि मंडळ नावारूपाला आणण्यात अध्यक्ष पद,खजिनदार म्हणून काम केले. मंडळातर्फे सादर होणाऱ्या नाटकामध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. तिथे येणाऱ्या नवीन माणसांना सिंगापूरमध्ये बस्तान बसवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.

सिंगापूर मधील शब्दगंध या कार्यक्रमात सहभागी होताना कालिदासांच्या ऋतू संहार या संस्कृत काव्याचे मराठी गद्य अनुवादीत केले.आणि तेंव्हा पासून मनात दडलेल्या सुप्त संस्कृत चा व्यासंग वाढू लागला. त्या काव्याला अनुसरून चित्रेही स्वतः तयार केली.त्या काव्याच्या स्लाईड्स यथावकाश तयार स्वतः बनवल्या आणि त्याचे बऱ्याच ठिकाणी स्लाईड शोही केले.

त्या काव्यापासून सुरू झालेला अनुवादाचा प्रवास जयदेवांचे गीत गोविंद, गंगालहरी ,मुकपं चशती यांचेही अनुवाद पूर्ण झाल्यावर स्तोत्राकडे वळलl.या सर्वांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली.नेहमीच्या नित्य पाठातील स्तोत्रे,शिवतांडव,राम तांडव ,मंत्र पुष्पांजली अशी ६० पेक्षा जास्त स्तोत्रे अनुवादीत केली.पैकी ५० स्तोत्राचे स्तोत्र मंजुषा हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्या सर्व पुस्तकांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नाटकाची आवड पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित नाट्य स्पर्धेतही सहभाग घेऊन जोपासणे चालू आहे.

करियर विषयी अगदी थोडक्यात...

संस्कृत स्तोत्रांचा आणि श्लोकांचा सहज सोप्या भाषेत अनुवाद  करणाऱ्या धनंजय बोरकर यांचा जन्म पुणे येथे १० जानेवारी १९४८ ला झाला. वडील मुकुंद रा.बोरकर हे वैद्य होते तर आई मनोरमा बोरकर या गृहिणी होत्या. वडिलांकडून संस्कृत चे प्राथमिक धडे आणि संस्कृत ची आवड ही देणगी मिळाली तर आईकडून खेळाची आणि गाण्याची. नवीन मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. नूतन मराठी मध्ये  ११ वी पर्यंतच् शिक्षण झाले.इयत्ता सातवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे शाळेत बोर्डवर झळकले. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती केवळ १ मार्काने हुकल्याने दुसऱ्या बिडकर शिष्यवृत्तीवर समाधान मानावे लागले.परंतु संस्कृत बद्दलची आवड मनात लपून राहिली होतीच.

भारत स्काऊट संस्थे मध्ये उत्तम स्काऊट, स्विमर म्हणून ओळख.तिथल्या शिस्तीत काम करून असिस्टंट कमिशनर या पदापर्यंत पोहोचले. १९६३ साली सर परशुराम भाऊ महाविद्यालयात विज्ञान शाखेतील २ वर्षे आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये टेलिकॉम शाखेतील शिक्षण पहिल्या वर्गात उत्तीर्ण . १९६९ साली. पहीली नोकरी mseb मध्ये  ३ महिने यूपीएससी मधील कठीण पटिक्ष उत्तीर्ण होताच पुण्याच्या   explosive research & development मध्यें ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून करिअरला सुरुवात. सिनियर सायंटिस्ट म्हणून १९७९ पर्यंत कार्य केल्यावर मुंबईला एअर इंडिया मध्ये इंजिनिअरिंग ट्रेनिंग शाखेत १९९२ पर्यंत कार्य.उत्तम इंस्ट्रक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक होता. १९९२ साली त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर आणि हुशारिवर सिंगापूर airline ने निवडले.

आणि इतर बरेच काही...

द न्यूज लाईन चॅनल तर्फे श्री. धनंजय बोरकर यांना ८ जून २०२४ रोजी, त्यांच्या संस्कृत काव्यांच्या मराठी भावानुवादांसाठी ‘साहित्यरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.